सात दिवसीय श्रीराम कथेचा मंगलमय शंखनाद; कथा महात्म्यावर लाल गोविंद प्रभू यांचा अमृतवर्षाव

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) :
वरुड फाटा जालना रोड येथील इस्कॉन वी.ई.सी.सी. मंदिर प्रांगणात पवित्र पुरुषोत्तम मासाच्या प्रारंभपूर्व निमित्ताने सात दिवसीय भव्य मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम कथा सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्याला मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला. कथेच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण परिसर जय श्रीरामच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
विश्वविख्यात प्रवक्ता लाल गोविंद दास यांनी व्यासपीठावरून ज्ञान, वैराग्य आणि भक्तीची त्रिवेणी प्रवाहित केली. त्यांच्या प्रभावी आणि रसाळ कथनाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. कथेच्या पहिल्या दिवशी प्रभूजींनी रामकथा महात्म्य यावर प्रकाश टाकताना सांगितले की, पुरुषोत्तम मासात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या कथेचे श्रवण केल्याने मानव जीवन धन्य होते. त्यांनी प्रभू श्रीरामांच्या दिव्य
अवतारामागील गूढ कारणांचे सविस्तर विवेचन केले. आयोजन समितीचे एन. के. गुप्ता, राजेश भारुका, राजकुमार अग्रवाल, जगदीश अग्रवाल, गोविंद गोयल आदींनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी इस्कॉन अन्नमृत उपक्रमाचे भारतभर नेतृत्व करणारे मुंबईचे राधाकृष्ण प्रभू व पालिका माताजी यांचीही विशेष उपस्थिती लाभली.
प्रमुख पाहुणे म्हणून राजकुमार माणकचंद अग्रवाल, राजेश कमलनयन भारुका, एन.
के. गुप्ता, डॉ. पुरुषोत्तम अग्रवाल, ओमप्रकाश घीसालाल गोयल, गोपाल मुक्तिलाल अग्रवाल यांच्यासह सीताराम अग्रवाल, अनिल पटेल, राजेंद्र माहेश्वरी, अनिल मुनोत, आशीष अग्रवाल, आशीष भारुका, कपिल पटेल, जीतू पटेल, संदीप नाथानी, नितीन बगडिया, रमेश नागपाल, मनोज बजाज, गिरधर संगरिया, सखाराम अर्जुनराव चादरें, आनंद भारुका यांनी दैनंदिन यजमान म्हणून सहभाग नोंदविला. आज (दि.१६) कथेच्या दुसऱ्या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. दररोज दुपारी ४.३० ते सायंकाळी ७.३० वाजता इस्कॉन वी.ई.सी.सी. निर्माणाधीन मंदिर, वरुड फाटा येथे कथा आयोजित केली असून दररोज कथेनंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. याचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्रीराम कथा सेवा समितीने केले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions